शब्दशक्ती
शब्दे वाटू धन जन लोकां…


आम्ही कोण ?

शब्दशक्ती या संकेतस्थळावर तुम्ही विविध साहित्यकृती वाचू शकाल. मी आणि माझे स्नेही यांनी स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं आणि कलाकृती सादर करण्याचं हे ठिकाण. आमचे उपक्रम असे आहेत….

नुकतेच प्रसिद्ध केलेले साहित्य

कथा

मी लिहिलेल्या काही कथा. वेगळे विषय पण कथेची रचना जुन्या पद्धतीची. कहाण्या, पंचतंत्र, वेताळ पंचविशी, इसाप नीती, परिकथा हे माझे आवडते साचे.

नाटक

जीवनभाषा

विज्ञान-तंत्रज्ञान

आजूबाजूच्या लोकांना आणि मुख्यतः मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी यासाठीचा हा उपक्रम आहे. पूर्वी “विज्ञानदूत” हे मासिक आम्ही चालवत होतो. त्याचे मागील काही अंक डाउनलोडसाठी इथे उपलब्ध आहेत.

बागकाम

घराच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे ८ गुंठे जागेत आम्ही विविध भाजी, फळे व फुले लावत असतो. निसर्गाच्या सहवासातले क्षण मिळवावेत आणि निर्मितीचा आनंद उपभोगावा हे या मागचे उद्देश आहेत. त्या शिवाय घरच्या भाजी, फळांची चव काही औरच. आम्ही हे काम करताना रासायनिक खते औषधे यांचा वापर करत नाही. जास्तित जास्त गोष्टींचा पुनर्वापर करतो. ८ गुंठे जागेत दोन माणसांच्या श्रमाने काय काय साध्य होईल हे समजून घेण्याचा हा प्रयोग आहे असंही म्हणता येईल. लौकरच बागकामाची आवड असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणून बगीचा मंडळ चालू करणार आहोत.

बौद्ध तत्वज्ञान

मी बौद्ध तत्वज्ञानाचा चाहता आहे. जगाला करुणेच्या मिठीत घेणारे हे तत्वज्ञान आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा मी लावलेला अर्थ:

वाचाल तर वाचाल

संपर्क

आमच्याशी इथे संपर्क साधा:-
freebirdEmail.png


Author: प्रसाद मेहेंदळे

Created: 2018-02-19 Mon 14:32