UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


निरोप्या

आचार्य विनोबा भावे हे गेल्या शतकातले एक भारतीय तत्वचिंतक. सर्व भारतीय भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विविध धर्मांचा, प्राचीन आणि तत्कालिन सामाजिक स्थितीचा, ज्ञान-विज्ञान-कला-साहित्य यांचा सखोल अभ्यास आणि मुख्य म्हणजे त्या अनुषंगाने येणाऱ्या तत्वांचं स्वतःच्या जीवनात केलेलं आचरण (म्हणून तर ते आचार्य !) हे विनोबाजींचं वैशिष्ट्य होतं. विनोबांच्या आयुष्यातला एक महत्वाचा अध्याय म्हणजे त्यांची भूदान चळवळ. या चळवळीच्या निमित्तानं त्यांनी भारतभर पदयात्रा केली. त्यावेळी ग्रामस्थांशी केलेली बातचीत हा त्यांच्या ” निरोप्या ” या पुस्तकाचा विषय आहे. भूदान स्वीकारणं आणि जमिनीचं पुन्हा वितरण करणं, हे करताना कालातीत तत्वांची ओळख त्यांनी जनसामान्यांना करून दिली. आणि लोकांच्या आयु्ष्यात एका खऱ्याखुऱ्या आचार्याचा प्रवेश झाला.

अत्यंत प्रभावी आणि प्रखर विचार हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. साधी भाषा, विलक्षण तर्क, आणि सोपी उदाहरणे असली तरी प्रत्येक पान अनेकदा वाचून मगच हे विचार समजून घ्यावे लागतील. निरोप्या हे पुस्तक मी येथे pdf form मधे download करण्यासाठी ठेवले आहे. एकानंतर एक प्रकरणे क्रमशः उपलब्ध होतील.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-17 Fri 14:56