UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


हिरवी माया

विज्ञान केंद्रातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. कचरा हा एक डोकेदुखी निर्माण करणारा प्रश्न होऊन बसला आहे. स्वयंपाकघरातील कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करून त्यात भाजी लावता येते. हे करण्यासाठी एक गठ्ठा उत्तर विज्ञान केंद्राने साऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

खरं तर यात विज्ञान केंद्राने काहीही नवे व मूलभूत संशोधन केलेले नाही. मात्र अनेकांच्या अनुभवांतून शिकून एक समावेशक उत्तर शोधण्यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. स्वयंपाकघरातील कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट मधे करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचा संच करून तो "हिरवी माया" या नावाने विज्ञान केंद्र उपलब्ध करून देते. त्यासंबंधीची माहिती पुस्तिका येथे डाउनलोड करता येईल. तुम्ही या आधीच "हिरवी माया" हा संच वापरत असाल तर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. विज्ञान केंद्राचे सदस्य या प्रश्नांची उत्तरे लौकरात लौकर देतील.


अनुक्रमणिका


Author: सम्यक

Created: 2018-02-19 Mon 14:35