UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


सात सवयी - भाग २

तिसरी सवयः प्राधान्यक्रम ठरवता येणे

Put first things first. आपल्या सगळ्यांना रोज वेगवेगळी कामं करावीच लागतात. काही कामं हा दिनचर्येतला अपरिहार्य भाग असतो. काही कामं आपण ठरवलेली असतात. या सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवता येणं ही महत्वाची सवय आहे.

हे करू की ते करू हे कळत नाही कारण मर्यादित वेळ उपलब्ध आहे अशी आपली अवस्था अनेकदा होत असते. प्राधान्य क्रम ठरवण्यासाठीची एक सोपी युक्ती स्टीफन कॉवी सांगतात.

प्राधान्यक्रम ठरवताना

priority.png
प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी आलेख

  • तुमच्या समोरच्या कामाची निकड किती आहे ते ठरवा.
  • तुमच्या समोरच्या कामाचे तुमच्यासाठीचे महत्व किती ते ठरवा.
  • त्यानुसार हे काम कोणत्या चतुर्भागात येते हे वर दिलेल्या आकृतीचा वापर करून ठरवा.
  • जर एक या चतुर्भागात काम असेल, (महत्वाचं आणि निकडीचं) तर ते तुम्हाल करावंच लागेल. ते लगेच करायला घ्या आणि करून टाका.
  • जर दोन या चतुर्भागात काम असेल तर फारच उत्तम. निकडीचं आणि महत्वाचं काम (पहिला चतुर्भाग) संपल्यावर हे काम लगेच करायला घ्या. कारण ते आज निकडीचं नाही पण महत्वाचं आहे. त्यामुळे ते शांतपणे आणि निश्चिंत मनानं तुम्ही करू शकाल. या चतुर्भागात कामं करणं अंतिमतः कल्याणकारी आहे. कारण त्यामुळे कामांचा ताण येत नाही, आणि कामं गुणवत्ता-पूर्ण होतात.
  • तीन या चतुर्भागात काम येत असेल तर ते करण्याचं टाळलेलं बरं. कारण ते निकडीचंही नाही आणि महत्वाचंही नाही !
  • चार या चतुर्भागात काम येत असेल तर ते निकडीचं असतं पण तुमच्यासाठी महत्वाचं नसतं. हा प्रकार थोडा समजून घ्यावा लागेल. एक उदाहरण घेऊया. माझी खोली स्वच्छ नाही. तासाभरात माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. अशा वेळी ही स्वच्छता निकडीची आहे पण ती मी करणं महत्वाचं नाही. माझ्या सहाय्यकावर ही जबाबदारी सोपवणं योग्य होईल, ज्याचं तेच काम आहे.

मागील पान पुढील पान


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-19 Sun 12:30